कोंकण एक स्वप्न नगरी

कोकणाला ७२० किमी लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे, तो उत्तरेला डहाणू आणि बोर्डी तसेच दक्षिणेला वेंगुर्ला येथे पसरत गेलेला आहे. कोकण हे सात जिल्ह्यांनी बनलेले आहे. ते म्हणजे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग.

कोकण हे भौगोलिक, सांस्कृतिक आणि वास्तू अशा अनेकगोष्टीत आवड निर्माण करणारे ठिकाण आहे. कोकण किनारपट्टीवर सुपारीची, नारळाची झाडे, आंब्याची झाडे आहेत तसेच शेती, मंदिरे, खाडी, सागरी किल्ले, बंदरे, गरम पाण्याचे झरे, लेणी आणि कौलारू घरे येथे आहेत.

महाराष्ट्रात कोकण हे एक मुख्य पर्यटन क्षेत्र आहे. कोकणातील सुंदर सागरी किनारे, हिरवीगार पालवी, जगप्रसिद्ध वारली कला आणि सागरी किल्ले याकडे पर्यटक सतत आकर्षित होतात.

पर्यटन स्थळे

धार्मिक स्थळे

वज्रेश्वरी मंदीर, कुणकेश्वर मंदीर, सागरेश्वर मंदीर, परशुराम मंदीर, वेळणेश्वर शिव मंदीर, गणपतीपुळे मंदीर, कनकेश्वर मंदीर, हेदवी मंदीर

किल्ले

रायगड किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, विजयदुर्ग किल्ला, वसई किल्ला, मुरुड जंजिरा किल्ला, रत्नदुर्ग (भगवती) किल्ला, कर्नाळा किल्ला, कुलाबा किल्ला

सागरी किनारे

डहाणू आणि बोर्डी किनारा, आजर्ले किनारा, तारकर्ली किनारा, चिवला किनारा, तोंडवळी किनारा, मिठबाव किनाराअलिबाग किनारा, वरसोली किनारा, किहीम किनारा, श्रीवर्धन किनारा, हरिहरेश्वर किनारा, दिवेआगर किनारा, गणपतीपुळे किनारा

थंड हवेचे ठिकाण

माथेरान हिल स्टेशन, आंबोली हिल स्टेशन, जव्हार हिल स्टेशन, माळशेज घाट

Tags: , ,

Leave a Reply